ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प


सोलापूर : संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ठाकुरवाडी फाटा येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान जामखेड येथून मुरमा येथील कालिका जिनिंग वरती कापूस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून गाडीने धडक दिल्याने कपाशीची ट्रॉली पलटी झाली असून ट्रॅक्टर ट्रॉली मधील ३० ते ४० क्विंटल कापूस हा संपूर्ण महामार्गावर पसारला असल्यामुळे तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरती पलटी झाल्याची घटना स्थानिक नागरिकांना कळतात नागरिकांनी महामार्गावर धाव घेऊन महामार्गावर पलटी झालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीला रस्त्याच्या कडेला घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालू केली.