एक रुपयात आरोग्य चाचणीला मूर्त रुप देणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती बाळकडू : नंद वारुंगसे

 एक रुपयात आरोग्य चाचणीला मूर्त रुप देणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती बाळकडू : नंद वारुंगसे


 शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी योजनेला लवकरच मूर्त रुप देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. नुकताच खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राजेश टोपे यांच्या वाट्याला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं आलं आहे. या खात्याला आपण न्याय देणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी ही आता महा विकास आघाडीचंधोरण झालं असून लवकर याच्या अमंलबजावणी संदर्भातला कार्यक्रम । जाहीर करू असं टोपे यांनी म्हंटलं आहे.