पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता संचारबंदीचं आवाहन केलं असून आज अनेक ठिकाणी लोकांकडून या आवाहनला उत्तम प्रतिसाद मिळत असत्याचं चित्र आहे . लोक दिवसभर आपल्या घरात थांबल्याने करोना विषाणूंचा फैलाव थांबेल असा दावा करण्यात येत आहे. मात्र तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. रविवारी अनेकजण घरात थांबले असून यामुळे लोकांचा विषाणूंच्या संपकात येण्यापासून बचाव होईल. तज्ञांनी हा एक चांगला प्रयत्न असून यामळे लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा संदेश पोहोचत असल्याचं मत नोंदवलं आहे. मात्र यामुळे करोनाच्या विषाणूची साथ थांबेल असा दावा कारणं जरा जास्त धैर्याचं असेल असंही ते म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात असा कोणताचदावा केला नव्हता. एम्समधीलमायक्रोबायोलॉजीच्या मीलोनागो माजी प्रमख डॉक्टर शोभा यांनी सांगितल्यानुसार, “फक्त एक दिवस लोकांमध्ये अजिबात संपर्क न आल्याने विषाण नष्ट होती असं म्हणणं चुकीचं आहे. यामुळे विषाणूंचा फैलाव कमी करण्यात नक्की मदत होईल. पणयामुळे साखळी अजिबात तुटणार नाही. विषाणू २० ते २२ तासात नष्ट होतात असा कोणताही पुरावा नाही. मंत्रालयाने हा मुद्दा जरा जास्त फगवून सांगितलेला दिसत आहे. जनता कपमुळे लोकांना सोशल डिन्स्टन्सिंगचं महत्त्व मात्र नक्की कळेल". आरोग्य विभागाचे सहसचिव अग्रवाल यांनी नरेंद्र मोदींच्या आवाहनला जनतेने प्रतिसाद दिल्यास करोना विषाणचा फैलाव रोखला जाऊ शकतो असा दावा केला होता. “करोना विषाणूचा फैलाव कसा रोखावा हा नरेंद्र मोदींच्या भाषणातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता. जनता संचारबंदीच्या माध्यमातून आपण सोशल डिन्स्टन्सिंगचा प्रयत्न करु शकतो. हा एक दिवस आपल्याला विषाणू रोखण्यात मदत करु शकतो. याशिवाय उपराष्ट्रपती बैंकय्या नायडू यांनीदेखील असाच दावा केला होता.
विषाणूची साथ थांबेल का?