अत्यावश्यक वस्तू चालू राहतील - वासिंद व्यापारी मित्र मंडळ

- वासिंद व्यापारी मित्र मंडळ वासिंद : वासिंद व परिसरातील सर्व दुकानदार, नागरिक व ग्राहकांना सुचित करण्यात येते कि,जास्त वेळ ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सोमवार दि.23/03/2020 पासून वासिंद मधील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने,डेअरी हे सरकारी नियमांचे पालन करून चालु ठेवतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व ग्राहक व नागरिकांना विनंती करतो कि,आपण एकदम गर्दि न करता शक्य तेवढी सुरक्षा व्यवस्था करून आपली स्वतःची व इतरांची काळजी घेऊन दुकांदाराकडे whatsapp वर किंवा प्रत्यक्ष भेटून आपल्याला आवश्यक असणाऱ्या सामानाची यादी,आपला फोन नंबर व पत्ता दुकानदाराकडे देऊन ताबडतोब निघून जावे,दुकानात गर्दि करून थांबू | नये,आपल्याला ताबडतोब सामान मिळणार नाही, काही वेळाने आपल्याला घरपोच सामान मिळेल. दुकांदारांनीही आपल्या दुकानात स्वछता ठेऊन | मास्क,सॅनिटायझरसारख्या सुरक्षा व्यवस्था ठेऊनच ग्राहकांशी संवाद साधावा.